आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली नीती केवळ राजकारण किंवा अर्थशास्त्रापुरती मर्यादित नाही, तर ती मानवी जीवनातील प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरते. हजारो वर्षांनंतरही त्यांचे विचार आजही तितकेच प्रभावी आहेत. यशस्वी आणि सन्माननीय जीवन जगण्यासाठी त्यांनी सांगितलेले १० दुर्मिळ जीवनमंत्र खालीलप्रमाणे आहेत.
हे ही वाचा : Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
१. पूर्णपणे कोणावरही अवलंबून राहू नका
स्वत:च्या कष्टावर आणि बुद्धीवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, जेव्हा अंधार होतो, तेव्हा तुमची स्वतःची सावलीही तुमची साथ सोडते. दुसऱ्यावर विसंबून राहणारी व्यक्ती कधीही प्रगती करू शकत नाही. तीच बाब तुमच्या आयुष्याची, जेव्हा अपयश येते तेव्हा सावलीसारखी तुमच्या भोवती असणारे लोक तुमची साथ सोडतात, म्हणून स्वावलंबी व्हा.
२. ज्ञानी लोकांच्या सहवासात राहा
ज्या शहरात किंवा ठिकाणी विद्वान आणि ज्ञानी लोक राहत नाहीत, तिथे कधीही वस्ती करू नका. शहाण्या लोकांच्या अभावामुळे प्रगतीचे मार्ग खुंटतात आणि विचारांची वाढ थांबते. याउलट तुम्ही जेव्हा तज्ज्ञ, विचारवंत मंडळींच्या सहवासात राहता तेव्हा तुम्ही योग्य दिशेने विचार करता आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता.
३. भुकेल्या लोकांसमोर अन्न खाणे टाळा
जेव्हा एखादी व्यक्ती भुकेली असते आणि तुम्ही तिच्यासमोर अन्न खाता, तेव्हा नकळतपणे तुम्ही 'गुप्त शत्रू' निर्माण करत असता. हे केवळ शिष्टाचार नव्हे, तर ईर्ष्या टाळण्यासाठी आवश्यक असलेले समाजशास्त्र आहे. हे फक्त भुकेबाबत नाही, तर प्रत्येक गरजवंताची गरज ओळखून त्याच्यासमोर सुखवस्तू जीवनशैलीचे प्रदर्शन टाळा.
हे ही वाचा : Numerology: 'या' जन्मतारखेच्या लोकांकडे असते समोरच्याचं मन वाचण्याची दैवी शक्ती!
४. प्रेमाचे प्रदर्शन उघडपणे करू नका
आपल्या प्रिय व्यक्तीबद्दलचे प्रेम किंवा जिव्हाळा सर्वांसमोर उघडपणे व्यक्त केल्याने तुमच्याबद्दलचा आदर कमी होण्याची शक्यता असते. काही गोष्टी खासगी ठेवण्यातच शहाणपण असते. विशेषतः आताच्या काळात सोशल मीडियावर केले जाणारे प्रदर्शन तुमच्या नात्यासाठी बाधक ठरणार नाही याची काळजी घ्या.
५. काळाप्रमाणे बदलणे शिका
जे लोक जुन्या विचारांना किंवा पद्धतींना धरून बसतात, ते लवकर कोसळतात. लवचिकता हा जीवनाचा नियम आहे. जो स्वतःला काळाप्रमाणे बदलतो, तोच टिकतो. नव्या गोष्टी, नव्या कला, नवे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्या.
६. सत्ताधाऱ्यांच्या अतिजवळ जाऊ नका
राजसत्ता किंवा अधिकार पदावर असलेल्या लोकांशी जास्त जवळीक धोकादायक ठरू शकते. सत्तेची ऊब जशी उबदार असते, तशीच ती तुम्हाला जाळून खाक करण्याची ताकदही ठेवते.
७. अकार्यक्षम लोकांना समूहात ठेवू नका
तुमच्या टीममध्ये किंवा मित्रमंडळीत एकही कच्चा दुवा असेल, तर तो संपूर्ण शक्तीचा नाश करू शकतो. ध्येय गाठण्यासाठी सक्षम आणि हुशार लोकांची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे.
हे ही वाचा : Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
८. शक्ती नसतानाही दुर्बळ दिसू नका
ज्या सापाकडे विष नसते, त्यानेही तो विषारी असल्याचे नाटक केलेच पाहिजे. जर तुम्ही लोकांना तुमची कमजोरी दाखवली, तर लोक तुमचा फायदा घेतील. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सामर्थ्य नसतानाही निर्भय दिसणे ही एक रणनीती आहे.
९. कर्ज मृत्यूपेक्षा भयानक आहे
कर्ज हे केवळ पैशांचे ओझे नसते, तर ते दररोज तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेते. मृत्यू एकदाच येतो, पण कर्जाचा डोंगर माणसाला रोज थोडं थोडं मारतो. त्यामुळे कर्जापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
१०. गुरूंबद्दल कधीही अपशब्द वापरू नका
ज्यांनी तुम्हाला शिकवले किंवा मार्गदर्शन केले, अशा गुरूंचा अपमान करणे म्हणजे स्वतःच्या ज्ञानाचे दरवाजे कायमचे बंद करणे होय. आदर हा ज्ञानाचा पाया आहे. गुरूंच्या अपरोक्ष अर्थात ते अनुपस्थित असतानाही त्यांच्याबद्दल अपशब्द काढू नका. त्यांनी शिकवलेल्या चांगल्या गोष्टी स्मरणात ठेवून त्यांचा आदर बाळगा.
हे ही वाचा : Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच!
Web Summary : Chanakya Niti offers timeless wisdom for a successful, respectful life. Rely on yourself, seek wise company, avoid displaying affection openly, adapt, and respect teachers. Debt destroys daily.
Web Summary : चाणक्य नीति सफल और सम्मानजनक जीवन के लिए कालातीत ज्ञान प्रदान करती है। आत्मनिर्भर रहें, बुद्धिमानों की संगति करें, खुले तौर पर स्नेह प्रदर्शित करने से बचें, अनुकूलन करें और शिक्षकों का सम्मान करें। ऋण प्रतिदिन नष्ट करता है।